Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

मीत जाधवचे सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 

मीत जाधवचे सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश

महाबळेश्वर टाईम्स 


नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली, ता. महाबळेश्वर येथील विद्यार्थी मीत विजय जाधव याने उत्तुंग यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. मीतने महाबळेश्वर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

मीतने शैक्षणिक वर्षात विविध वक्तृत्व स्पर्धांमध्येही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे तसेच उपशिक्षक महेश पवार व सचिन जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे, यंदाच्या शैक्षणिक वर्षात या शाळेतील तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून एका विद्यार्थिनीची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. शाळेने सातत्याने शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय, विद्या निकेतन तसेच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

मीतच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी विजय विभुते, गटशिक्षण अधिकारी प्रतीक कडू, केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम, दगडू ढेबे, संजय पार्टे, विनायक पवार, आनंदा शेलार, सर्जेराव बडे, अमोल कुंभार, प्रदीप दाभाडे, तसेच सरपंच दिपाली पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लता जाधव, संतोष जाधव, संपत जाधव, कोंडिबा जाधव व संतोष मोरे यांनी मीतचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.