Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

रियाज डांगे यांची अन्न व औषध ग्राहक कल्याण समितीच्या च्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

 रियाज यासिन डांगे यांची अन्न व औषध ग्राहक कल्याण समितीच्या च्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर : प्रतिनिधी



अन्न व औषध ग्राहक कल्याण समितीच्या ‘फूड बिझनेस ऑपरेटर्स सेल’च्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी रियाज यासिन डांगे यांची मानद नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या वतीने ६ ऑगस्ट २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.


अन्न व औषध ग्राहक कल्याण समिती ही बिगर-नफा संस्था असून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, ग्राहक जनजागृती तसेच अन्न व्यवसाय क्षेत्रातील गुणवत्ता व सुरक्षिततेच्या दर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यरत असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. अन्न व औषध सुरक्षेसह विविध सार्वजनिक हिताच्या विषयांवरही समितीच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.


रियाज यासिन डांगे यांचा नियुक्तीचा दोन वर्षांचा कार्यकाळ ६ ऑगस्ट २०२६ ते ५ ऑगस्ट २०२८ असा राहणार आहे. ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रात तसेच अन्न व्यवसायाशी संबंधित विषयांमध्ये जनजागृती व सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.


या नियुक्तीबद्दल रियाज यासिन डांगे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात ग्राहक हक्क, अन्न सुरक्षा आणि जनजागृतीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.