Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा पर्यटकाचा विसरलेला मोबाईल शोधून महाबळेश्वर पोलिसांच्या हस्ते केला सुपूर्द

 टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा पर्यटकाचा विसरलेला मोबाईल शोधून महाबळेश्वर पोलिसांच्या हस्ते केला सुपूर्द



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

येथे पर्यटनासाठी आलेले मुंबईतील पर्यटक ललित गाला (रा. कांदिवली, मुंबई) यांचा मोबाईल प्रवास करताना टॅक्सीमध्ये विसरला होता. मात्र, संबंधित टॅक्सी चालक श्रीधर विष्णू सपकाळ (रा. कोळी) यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट प्रामाणिकपणामुळे हा मोबाईल सुरक्षितपणे मूळ मालकाला परत मिळाला आहे.

​सविस्तर वृत्त असे की, ललित गाला हे महाबळेश्वर शहरात पर्यटनासाठी आले असता, टॅक्सीतून प्रवास केल्यानंतर त्यांचा किमती मोबाईल वाहनातच राहून गेला. काही वेळाने हा मोबाईल टॅक्सी चालक श्रीधर सपकाळ यांच्या निदर्शनास आला. त्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता त्वरित महाबळेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला.

​त्यानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पर्यटक ललित गाला यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. पोलिसांनी खातरजमा करून सदर मोबाईल गाला यांच्या स्वाधीन केला.

​आपला हरवलेला मोबाईल सुरक्षित परत मिळाल्याने ललित गाला यांनी टॅक्सी चालक श्रीधर सपकाळ आणि महाबळेश्वर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. चालक श्रीधर सपकाळ यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.


बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

        संपादक :- राहुल शेलार 

             📱 9765576377

  कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                📱 9403546 485