Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर येथील गिरिस्थान नगरपरिषद शाळा क्र. ५ मध्ये सैनिकांसाठी राख्या बनवण्याचा उपक्रम उत्साहात संपन्न

 महाबळेश्वर येथील गिरिस्थान नगरपरिषद शाळा क्र. ५ मध्ये सैनिकांसाठी राख्या बनवण्याचा उपक्रम उत्साहात संपन्न


महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर : प्रतिनिधी 

गिरिस्थान नगरपरिषद शाळा क्रमांक ५, महाबळेश्वर येथील विद्यार्थ्यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुंदर व आकर्षक राख्या बनवण्याचा उपक्रम नुकताच पार पडला. शाळेतील बालमित्रांनी स्वतःच्या हातांनी या राख्या तयार करून सैनिकांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले.

​हा स्तुत्य उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. देशमुख सर आणि श्री. हाडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सौ. जाधव मॅडम, सौ. काळे मॅडम, सौ. गायकवाड मॅडम  यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

​तसेच, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. नम्रता भिलारे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाला पालकांचाही मोठा पाठिंबा मिळाला. यात पालक श्री. ढेबे, हिरवे, भिलारे, वाडकर, आखाडे, वागदरे, गायकवाड, शिंदे, केळगणे व कोंढाळकर यांच्यासह इतर पालक, शाळेतील शिक्षकवृंद आणि बालवाडी शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमधील देशभक्तीची भावना वाढीस लावणार्‍या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.


        बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

              संपादक :- राहुल शेलार 

                 📱 9765576377

         कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                📱 9403546 485