Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर पोलीस ठाण्यातर्फे २५ ऑगस्टला गणेशोत्सव शांतता व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन

 महाबळेश्वर पोलीस ठाण्यातर्फे २५ ऑगस्टला गणेशोत्सव शांतता व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन

महाबळेश्वर टाईम्स 
महाबळेश्वर: प्रतिनिधी 

आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांसाठी एका विशेष सूचना व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक  आज मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:१५ वाजता महाबळेश्वर येथील पोलीस ग्राउंडशेजारील सह्याद्री रेस्ट हाऊस येथे पार पडणार आहे.


​गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियमावलींचे पालन करणे आणि उत्सवाचे नियोजन सुरळीत व्हावे या उद्देशाने ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, महाबळेश्वरचे तहसीलदार, महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.


​गणेशोत्सवाचे आयोजन अधिक सुरक्षित आणि यशस्वी व्हावे यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीस वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हीच उत्सवाच्या सुरक्षित आयोजनाची खरी गॅरंटी असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 

                  📱 9765576377

      कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                  📱 9403546 485