Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

एम.ई.एस. स्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष व पोलीस निरक्षक तसेच कर्मचाऱ्यांना बांधल्या स्वनिर्मित राख्या

एम  ई एस. स्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष व पोलीस निरक्षक  तसेच कर्मचाऱ्यांना बांधल्या स्वनिर्मित राख्या

महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर : एम.ई.एस. इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलच्या चौथी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत महाबळेश्वर पोलीस स्टेशन तसेच नगरपालिका कार्यालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकांसमवेत जाऊन स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या पोलीस व नगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना बांधल्या.



महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे तसेच त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी प्रेमपूर्वक राख्या बांधल्या. विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे पोलिसांनी कौतुक करून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.



त्यानंतर विद्यार्थिनींनी महाबळेश्वर नगरपालिका कार्यालयाला भेट देऊन नगराध्यक्ष सुनील शिंदे तसेच नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वहस्ते तयार केलेल्या राख्या बांधल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पोलीस आणि नगरपालिका कर्मचारी यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले.


स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या बांधून विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सामाजिक व बंधुभावाचा संदेश दिला. त्यांच्या या उपक्रमाचे पोलीस अधिकारी, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थित शिक्षकांनी कौतुक केले.