महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीत यंदा विक्रमी पाऊस; गतवर्षीच्या एकूण पर्जन्याचा टप्पा ओलांडला
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या पर्जन्य मापक केंद्रावर नोंदवल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या पावसाळ्यात महाबळेश्वरमध्ये तुफान पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या एकूण पावसाचा विक्रम मोडीत निघाला आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या चोवीस तासांत २१.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस ६२२२.७० मिलीमीटरवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच ५ सप्टेंबर २०२५ रोजी महाबळेश्वरमध्ये ५०.०० मिलीमीटर पाऊस झाला होता आणि त्या दिवशी एकूण पावसाची नोंद ५६३२.८० मिलीमीटर इतकी झाली होती. गेल्या संपूर्ण २०२५ या वर्षात एकूण ६१९७.५० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता. यंदा मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच एकूण पाऊस ६२२२.७० मिलीमीटर इतका झाला आहे. त्यामुळे चालू हंगामातच गेल्या वर्षातील एकूण पावसाचा टप्पा यशस्वीरीत्या पार झाला आहे.
इंचाच्या परिमाणात सांगायचे तर ५ सप्टेंबर २०२६ रोजी दिवसाला ०.८५८ इंच पावसाची नोंद झाली असून, यंदाचा एकूण पाऊस २४४.९८८ इंच झाला आहे. गतवर्षी याच दिवशी दिवसाला १.९६९ इंच पाऊस झाला होता आणि एकूण पाऊस २२१.७६४ इंच नोंदवला गेला होता. गेल्या संपूर्ण २०२५ वर्षाचा एकूण पाऊस २४३.९९ इंच होता, तर यंदाच्या हंगामात आत्तापर्यंतच २४४.९८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. चालू पावसाळ्यात झालेला हा मुसळधार पाऊस स्थानिक पाण्याचे स्रोत समृद्ध करणारा आणि निसर्गसौंदर्यात भर घालणारा ठरत आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin