Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी उत्साहात मतदान; अनुक्रमे ७८% आणि ९३% मतदानाची नोंद

 महाबळेश्वरमध्ये पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी उत्साहात मतदान; अनुक्रमे ७८% आणि ९३% मतदानाची नोंद



महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वर येथे विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला मताधिकार बजावला. दोन्ही मतदार संघांमध्ये मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्यामुळे चांगल्या मतदानाची नोंद झाली आहे.

​२९५/पदवीधर मतदार संघामध्ये एकूण २२७ मतदारांपैकी १७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १२२ पुरुष आणि ५६ महिला मतदारांचा समावेश असून येथे एकूण ७८ टक्के मतदान झाले.

​दुसरीकडे, १५८ - शिक्षक मतदार संघात मतदारांचा अत्यंत डिजिटल व शिस्तबद्ध प्रतिसाद पाहायला मिळाला. एकूण ८७ मतदारांपैकी ८१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ४९ पुरुष आणि ३२ महिला मतदारांनी सहभाग घेतला असून येथे तब्बल ९३ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.

​दिवसभरात दोन्ही केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. मतदान केंद्रावर प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती.

      बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

             संपादक :- राहुल शेलार 

               📱 9765576377

        कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

               📱 9403546 485