Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

मसल फॅक्टरी जिमचे स्थलांतर दिमाखदार उद्घाटन!

 मसल फॅक्टरी जिमचे स्थलांतर दिमाखदार उद्घाटन!


नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे फिटनेसप्रेमींना योग्य पर्याय



महाबळेश्वर टाईम्स


महाबळेश्वर शहरातील आरोग्य आणि फिटनेसप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून, हनुमान मंदिराजवळील हॉटेल सुदामा येथे सुरू करण्यात आलेल्या ‘ मसल फॅक्टरी’ (Muscle Factory – Nutrition, Supplements & Lifestyle) या अत्याधुनिक जिमचे उद्घाटन सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. या नव्या फिटनेस सेंटरमुळे महाबळेश्वर शहरासह ग्रामीण भागातील तरुणांना व्यायाम आणि आरोग्य संवर्धनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.


या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक अफजलभाई सुतार, आबा शिंदे, ॲड. संजय जंगम तसेच राजाभाऊ गुजर, जिमचे संचालक सुमित क्षिरसागर सर, सौ. पूजा सुमित क्षिरसागर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


अत्याधुनिक उपकरणांसह फिटनेसचा नवा अनुभव


‘मसल फॅक्टरी’मध्ये व्यायामासाठी उच्च दर्जाची आधुनिक मशिन्स व उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच व्यायामाचे योग्य तंत्र, शरीराची क्षमता आणि फिटनेसच्या उद्दिष्टांनुसार मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय फिटनेससाठी आवश्यक असलेल्या प्रमाणित सप्लिमेंट्सची सुविधाही येथे देण्यात येणार आहे. केवळ शरीरयष्टी कमावणे नव्हे, तर निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यावरही या जिममध्ये भर देण्यात आला आहे.


तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण


‘तुमच्या फिटनेस प्रवासासाठी आम्ही सदैव सोबत!’ हे ध्येय समोर ठेवून सुरू झालेल्या या जिममुळे शहरातील तरुणाई आणि फिटनेस प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधुनिक सुविधा आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यायामाची आवड वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


या उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सागर ढेबे, दतात्रय आखाडे आकाश झाडे, लक्ष्मण घोडके, प्रदीप बडगे, ऋषिकेश, व क्षिरसागर परिवार आणि मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले. नव्या जिमच्या माध्यमातून महाबळेश्वरमध्ये फिटनेस संस्कृतीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.