रान गव्याच्या हल्ल्यात महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.... महाबळेश्वर टाईम्स तापोळा : प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट या गावातील रहिवाशी राघू जानू कदम या शेतकराचा जागीच मृत्यू झाला. राघू कदम हे सकाळी शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपार नंतर गावातील अन्य लोक शेतात जात असताना राघू कदम मृत अवस्थेत पडलेले दिसले. राघू कदम यांच्यावर रान गव्याने शिंगाने जबर हल्ला केला असून रान गव्याने जोरदार धडक दिल्याने राघू कदम हे जागीच मृत पावले. रानगव्याची संख्या जास्त झाल्याने शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे. आज च्याघटनेमुळे गावातील तसेच तापोळा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही दुःखद घटना समजताच परिसरातील लोकांचा जनसमुदाय जमा झाला. तसेच घटनास्थळी वन अधिकारी, पोलीस कर्मचारी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. व पुढील तपास पोलीस प्रशासन,वन विभाग करत आहेत. Mahabaleshwar Times October 21, 2025
महाबळेश्वर नगरवासियांना महाबळेश्वर टाईम्स परिवारा तर्फे दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा Mahabaleshwar Times October 20, 2025
गिरिस्थान नगरपरिषद महाबळेश्वर संचलित, गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर झेंडूच्या फुलांचे स्टॉल्स Mahabaleshwar Times October 19, 2025
महिलांना न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग कटीबध्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर Mahabaleshwar Times October 16, 2025
महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडत जाहीर महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य पदाची आरक्षण जाहिर Mahabaleshwar Times October 13, 2025
महाबळेश्वर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून गणेश उत्तेकर यांची नियुक्ती* Mahabaleshwar Times October 11, 2025
*महाबळेश्वर प्रेमी ग्रुपतर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा-२०२५’ कार्यक्रम उत्साहात* Mahabaleshwar Times October 09, 2025
महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत जाहीर* Mahabaleshwar Times October 08, 2025
जिल्हा महाबळेश्वर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर..... Mahabaleshwar Times October 06, 2025
Social Plugin